

महात्मा फुलेंनी अविद्येमुळे स्त्री-शूद्र-आतिशूद्रांची झालेली अवनती ओळखून ज्ञानबंदी तोडली. त्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी सावित्रीबाई आणि फातिमाबी शेख यांच्या मदतीने भिडेवाडीत भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षक प्रशिक्षणासाठी पाठवले. सनातन्यांचा विरोध झेलत त्यांनी स्त्रीशिक्षणाची क्रांती घडवली. भिडेवाडीसाठी झालेला न्यायालयीन लढा आणि अॅड. निशा दाभाडे चव्हाण यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ही वास्तू स्त्रीमुक्तीच्या पहाटेची साक्ष आहे.