

अफजलवधाच्या पडद्यामागे ! प्रतापगडापाशी अफजलखानासह त्याच्या सैन्याचा शिवरायांनी के लेला नाश जितका सांगितला गेलाय, तितकाच अजूनही सांगायचा राहिला आहे. अफजलवधाचा श्रीगणेशा झाला तो वाघनखाच्या माऱ्याने आणि शेवट झाला खानाचे मुंडके कापण्याने ! निर्णायक क्षणी कोण विजयी होणार याचा निकाल लावणारे महाराजांचे ते वाघनख, इतिहासात मानाचे स्थान पटकावून बसले आहे. हे जसे होते महाराजांचे वाघनख, तसेच असते ऐतिहासिक पुराव्यांचे वाघनख ! महाराजांचे वाघनख मुठीत लपलेले अगदी लहानसे हत्यार ! असेच इतिहासाच्या मूळ कागदपत्रात झाकले गेलेले त्रोटक पण महत्त्वाचे पुरावे हीसुद्धा वाघनखेच! ही पुराव्यांची वाघनखे खोट्या इतिहासाच्या चिंध्या करतात, अनेक घटनांचे वेगळे अर्थ समोर आणतात आणि नव्या इतिहासाची भरदेखील घालतात ! यातून अनेक अनपेक्षित बाबी समोर येत जातात. आपल्याला माहिती असलेल्या अफजलवधाच्या पडद्यामागे काय काय दडले आहे ते दिसते. आणि या सर्वांचा मेळ घालून अफजलवध जसा आहे तसा स्पष्ट के ल्याशिवाय अफजलवधाची गोष्ट संपतच नाही. अफजलवधाचा निरनिराळ्या कोनातून समग्र लेखाजोखा म्हणजे हे ‘वाघनख