

काळानुसार मानवी जीवन, भाषा आणि संस्कृती बदलत जाते, तसेच अनेक संदर्भ काळाच्या पटलावर नाहीसे होत जातात किंवा गरजेनुसार ते अद्ययावत होतात. त्यामुळे येत्या काळाच्या हाका ऐकू न गतकाळातील चांगला, ताकदवर आशय वाचकांना उपलब्ध करून देणे, हे आपले कर्तव्य आहे. या भूतकाळातील घटनांचे समकाळात आता पुन्हा नव्याने उत्खनन का के ले जात आहे, असाही प्रश्न वाचकांच्या मनात उपस्थित होऊ शकतो. परंतु आपल्या भूतकाळात जोरकसपणे मारलेल्या हाका कान देऊन ऐकणे, हे आपले कर्तव्य आहे. आज आपण जिथे आहोत. तिथपर्यंत पोहचत असताना आपले पूर्वज कोणत्या खाचखळग्यांतून गेले, त्यांना कोणती दिव् पार पाडा ये वी लागली, याची जिवंत अनुभूती आपल्याला ‘मानवजातीची कथा’ या ग्थाच्च् रं या माध्यमातून घेता येते. आज आपण ज्या संस्कृतीत जगत आहोत, ती प्राप्त होण्यासाठी आपल्याला हजारो वर् लागली. जग जर युद्धमु षे क्त असतेः या लढायांचा खणखणाट व दणदणाट जगात नसता, तर एवढी प्रगती आपण पाच शतकांत करू शकलो असतो. या भूतलावरून युद्ध ही वस् आज नष्ट झाल् तू याशिवाय खऱ्या प्रगतीला सुरुवात होणार नाही. हाच संदेश या ग्थाच्रं या माध्यमातून हेन्री थॉमस यांनी दिला आहे. आपल्याला शिकण्याची इच्छा असेल, तर इतिहासाने सर्वात महत्त्वाची अशी शिकवलेली ही गोष्ट आहे. एकूणच ‘मानवजातीची कथा’ म्हणजे हेन्री थॉमस यांच्या माध्यमातून काळाने सांगितलेली ही स्वतःचीच कथा आहे.