

अग्निपर्व म्हणजे काय किल्ले रायगड आणि अग्निपर्व याचा नक्की संबंध तरी काय अग्निपर्व पुस्तकात आहे तरी काय अग्निपर्व म्हणजे ईस्ट इंडिया कं पनीने डागलेल्या तोफगोळ्यांमुळे रायगडाने घेतलेला पेट. स्वराज्यवैभवाचे राणीव भोगणाऱ्या रायगडाची ती दर ु वस्था. अशा या गडावरील अग्नी तांडवाचे वास्तव म्हणजे ‘अग्निपर्व’. कं पनीच्या पारतंत्र्याला न जुमानता देशातील तरुणांच्या, क्रांतिकारकांच्या आणि समाजसुधारकांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवणारा रायगड, त्याचे हे ‘स्वातंत्र्यपर्व’. ईस्ट इंडिया कं पनीच्या ताब्यात रायगड गेल्यानंतर जळत असलेल्या पण तितक्याच बोलक्या रायगडावर पावलोपावली मिळालेले अनुभव सांगणारी एक रोमांचक कथा. पारतंत्र्यात असताना देखील स्वातंत्र्याची ठिणगी मनात पेटवलेल्या रायगडाच्या ‘अग्निपर्व’ची ही कथा.