

खालील १२ प्रकारे हे पुस्तक मदतगार ठरू शकते.
• चाकोरीबद्ध मनाला उभारी देणारे नवीन विचार, आकांक्षा आणि नवीन दृष्टिकोन बहाल करते.
• सरळसाध्या रीतीने, लवकरात लवकर मित्र कसे मिळवावेत यासाठी मार्गदर्शन करते.
• लोकप्रियता वाढवण्यासाठी मदत करते.
• तुमची विचारपद्धती इतरांना पटवून, त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रेरक ठरते.
• कामे हातोहात होण्यासाठी तुमची क्षमता, प्रभाव आणि तुमची प्रतिष्ठा वाढवते.
• नवीन ग्राहकवर्ग आकर्षित करून घेण्यासाठी मदत करते.
• तुमची पैसा कमावण्याची पात्रता वाढवते.
• एक चांगला विक्रेता, एक चांगला व्यवस्थापक तयार करते.
• तक्रार निवारण करणे, कडवे वाद टाळणे आणि तुमचे मानवी संबंध मृदू व आल्हाददायक राखण्यास मदत करते.
• चांगला वक्ता, मनोज्ञ संभाषणपटू होण्याचा मार्ग दाखवते.
• तुमच्या दैनंदिन जीवनात मानसशास्त्रीय तत्त्वांचा अंतर्भाव सहजसोप्या पद्धतीने कसा करायचा ते शिकवते.
• तुमच्या सहकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे गुपित सांगते.