20% Discount All New Customers get register


भानामती हा लोकांसाठी आजही अतीशय गुढ विषय आहे. आजही अनेक लोकांच्या मनात भानामती बद्दल असंख्य प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे कुठे शोधावीत हे माहित नाही. आपोआप घरातील स्त्रियांच्या अंगावर, वक्षस्थळांवर फुल्या उमटतात, अंगावरचे कपडे फाटतात, घरातील भांडी उडतात, कपडे जळतात, घरावर वस्तू दगड येऊन पडतात, दवडीतील भाकरी आणि तिजोरीतील पैसे गायब होतात. काही लोकांच्या समोर अशा काही घटना घडल्या असल्याने त्या खऱ्या की खोट्या या व्दिधा मनस्थितीत असे लोक असतात. महाराष्ट्रात भानामतीचे प्रांतानूसार वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. ते भानामतीचे विविध प्रकार कोणते? अशा भानामती म्हणजे नेमके काय? भानामती खरंच असते का? भानामतीमध्ये नेमकं काय घडतं? भानामती कोणत्या कारणांमुळे सुरु होते? भानामती कशी ओळखावी? त्यावर उपाय काय? ती कशी थांबवावी? अशा भानामती संबंधीच्या सर्व प्रश्नांची पुराव्यांसह उत्तरे जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्या सर्व महाराष्ट्रात घडलेल्या सत्य घटना आहेत ज्या प्रा. श्याम मानवांनी हाताळल्या आहेत.