

आज गरज असलेली योद्धा आहे ती.
आपण वाट पाहात असलेली देवी आहे ती.
ती धर्माचं संरक्षण करेल. ती आपलंही रक्षण करेल.
ख्रिस्तपूर्व ३४०० सालातील भारत
विभाजन, असंतोष, गरीबीनं भारत त्रस्त आहे. लोक राज्यकर्त्यांचा तिरस्कार करतात. भ्रष्ट आणि स्वार्थी उच्चभ्रूंचाही ते तिरस्कार करतात. फक्त ठिणगी पडण्याचा अवकाश. गोंधळ माजण्यात आहे. बाहेरील जग या विभाजनाचा फायदा घेतं. दिवसेंदिवस लंकेचा राजा रावण अधिकाधिक शक्तिशाली होत आहे. दुर्दैवी सप्तसिंधू प्रदेशात तो आपले दात खोल खोल रुतवत आहे.
याच भारतात आहेत दोन शक्तिशाली जमाती. भारताच्या पवित्र भूमीचं रक्षण करणाऱ्या या दोन्ही जमाली ठरवतात – अती झालं आता. आता गरज आहे एका रक्षणकर्त्याची. ते शोध घेऊ लागतात.