

“पृथ्वीच्या जन्मापासून महाराष्ट्राच्या जन्मापर्यंतचा प्रवास, डार्विनच्या प्रयोगशाळेतून आणि संतांच्या अभंगातून एकाच वेळी वाचायचा असेल तर ‘आम्ही असू अभिजात’ हातात घ्यावाच लागतो. मराठी माती, मराठी शरीर आणि मराठी मन यांचा इतका शास्त्रीय आणि एकसंध उलगडा यापूर्वी मराठीत कुणी के लेला नाही. जीन्स, जैवरसायन, इतिहास, संतपरंपरा आणि राज्यघटना यांना जोडून मराठी अस्मितेचा घेतलेला हा समग्र वेध खरोखरच डोळे उघडणारा आहे.” “आम्ही असू अभिजात या ग्थात ‘म रं हाराष्ट्र धर्म’ म्हणजे नेमके काय याची व्यापक जाणीव करून देणारी आणि प्रत्येक मराठी माणसाने अभ्यासावी अशी अतुलनीय माहिती आहे. हा मराठी माणसाकडे पाहण्याचा, त्याचे विश्लेषण करण्याचा शास्त्रशुद्ध प्रयत्न आहे.”