

सध्याचा काळ हा मानवाच्या आता पर्यंतच्या उत्क्रांती काळामधील सर्वांत चांगला, समृद्ध व सुवर्णकाळ म्हणावा लागेल. कारण असा काळ यापूर्वी नव्हता. भविष्यातही असा समृद्ध काळ राहील असे सांगता येत नाही. आपली आजची पिढी ही सर्व सुख, सोईनी समृद्ध आहे. आपल्याकडे सर्व प्रकारची आधुनिक साधनं उपलब्ध आहेत. मानवाला सुखाने जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत. त्या सर्व गोष्टी आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. पूर्वी माणूस भटकं ती करायचा. आता माणसाला स्थैर्य लाभलं आहे. माणसाच्या अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा तर पूर्णहोतच आहेत. त्यासोबतच इतर सर्व गरजाही पूर्णहोत आहेत. आज रोजी पूर्वीच्या तुलनेत माणसाकडे सर्व सुख, सुविधा उपलब्ध आहेत. तरीही माणूस सुखी नाही. कारण माणूस समाधानी नाही. सुख हे छोट्या छोट्या गोष्टींमध् दडलेलं असतं. सुख ये हे आपल्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतं. मन सुखी असेल तर आपण सुखी असतो. मन दःखी असेल तर आप ु ण दःखी असतो. प्र ु त्येक माणसाची सुखाची व्याख्या ही वेगवेगळी असते. सर्व मानव प्राण्यांच्या जीवनाचा अंतिम उद्देश हा सुखाने आणि समाधानाने जीवन व्यतीत करणे हाच आहे. आपलं मन आनंदी असेल तर सारं जगही आपल्याला आनंदी दिसतं. हे जीवन परत मिळत नाही. हे जीवन आणि हे जग खरोखरच सुंदर आहे. फक्त जगाकडे पाहण्याचा चांगला व सकारात्मक दृष्टीकोन आपल्याकडे हवा.