Home

Description

‘सह्यजिनशी’ हा काव्यसंग्रह केवळ शब्दांची कलाकु सरच नाही, तर तो स्वराज्याच्या इतिहास आणि भूगोलाचा उमटलेला एक भावनिक प्रतिध्वनी आहे. यातील प्रत्येक कविता ही उर्जेचा एक प्रवाह आहे. सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरांसारखीच या संग्रहातील प्रत्येक कविता वाचकाच्या मनाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. इथे शौर्य आहे, त्याग आहे, स्वाभिमान आहे आणि त्याचबरोबर काळाच्या ओघात हरवत चाललेल्या मूल्यांची चिंतनपर मांडणीही आहे. कवीने केवळ भूतकाळातील वैभवाचे गुणगान के ले नाही, तर वर्तमान स्थितीवरही भाष्य के ले आहे, जे या संग्रहाला एक व्यापक परिमाण देते. कवी ‘निरांकु श’ म्हणजेच अंकु श पाटील यांनी इतिहास म्हणजे केवळ सनावळीतील घटना, किंवा गडकिल्ले म्हणजे केवळ दगडी बांधकाम; या दृष्टीने न पाहता, आपल्या संवेदनशील लेखणीतून इथल्या मातीचा सुगंध, इथल्या इतिहासाचा गौरव आणि इथल्या कणखर माणसांची गाथा शब्दबद्ध के ली आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. ‘सह्यजिनशी’ हे नावच या संग्रहाचा वेगळेपणा दाखवते. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणेच या कविता आपल्या मनात नवऊर्जा भरतात. ज्या आत्म्याला स्पर्श करतात. या कवितांमधून कवीने महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांच्या संस्कृतीचे, तिच्या वारशाच्या चैतन्याचे स्मरण के ले आहे.

related this items

Product Reviews

No reviews available for this product.

VIDYA BOOKS