

अंगुलीमालाच्या इतिहासाची के लेली ही उजळणी ज्याचे पापकर्मत्यानेच के लेल्या पुण्याने झाकले जाते, तो पुरुष ढगातून मुक्त झालेल्या चंद्रासमान इतरांना प्रकाशित करत असतो. अंगुलीमाल - इतिहासातील तो क्रूरकर्मा ज्याने शेकडो लोकांच्या हत्या करून त्यांच्या अंगुल्याच्या(करंगळीच्या) माळा बनवून गळ्यात घातल्या. असा निर्दयी, क्रूर, हत्यारा अंगुलीमाल बुद्धांना तरी का चंद्रासारखा प्रकाशमान वाटला असेल ? हातात खंडा घेऊन प्रतिदिन लोकांची मुंडकी उडवणारा, रक्तपात करणारा अंगुलीमाल बुद्धांच्या एका वचनाने भिक्षुक झाला तरी कसा? मुळात अंगुलीमाल होता तरी कोण ? कशासाठी आला? श्रावस्थीमध्ये कु ठू न आला ? अश्या कितीतरी प्रश्नांच्या उत्तरासाठी अंगुलीमालाच्या इतिहासाची के लेली ही उजळणी !