

शेअर बाजार म्हटलं की, समोर येणारं नाव म्हणजे वॉरन बफे. वॉरन बफे यांचं आयुष्य म्हणजे पैसे कसे मिळवावेत, कसे टिकवावेत आणि कसे वाढवावेत याचा आदर्श वस्तुपाठच आहे. त्यांचा हा जीवनप्रवास अत्यंत वेगवान आणि रोमांचक असा आहे. * चौदाव्या वर्षी आयकर भरणारा वॉरन ! * पस्तिसाव्या वर्षीच करोडपती होण्याचं ध्येय साध्य करणारा अवलिया * आजही पहिल्या पाच श्रीमंतांमध्ये स्थान असणारा * वॉरन बफेचे सिद्धांत आणि गुंतवणुकीचे तंत्रज्ञान * शेअर्सचं नेमकं मूल्यमापन कसं करावं ? * शेअर बाजारात मंदी असतानाही नफा कमवण्याचे शास्त्र