

मानसशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात मनोमापन व संख्याशास्त्र हे दोन स्तंभ मानले जातात. प्रस्तुत पुस्तकात गुंतागुंतीच्या मनोमापन व सांख्यिकीय तत्त्वांचा सोप्या भाषेत उलगडा करून विषयाचा कालानुक्रमिक विकास, जगभरातील संशोधन परंपरा आणि त्यांच्या उपयुक्ततेचा आढावा घेतला आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील पुस्तके आणि त्यातील संकल्पना समजणे कठीण जाते. विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय चाचण्यांचे स्वरूप, प्रकार व उपयुक्तता, संख्याशास्त्रातील तत्त्वे व पद्धती, स्पर्धा परीक्षांत विचारल्या जाणार्या संकल्पनांची सोपी व व्यवस्थित तयारी करता यावी तसेच व्यावहारिक जीवनात मनोमापनाची अंमलबजावणी करण्याचे कौशल्य प्राप्त व्हावे म्हणून मराठीत सुस्पष्ट व नेमक्या भाषेत अभ्यास सामग्री मांडण्याचा प्रयत्न केला आहे.