

मान्सूस म्हणजे केवळ मौसम किंवा पर्जन्याचा प्रवास नव्हे. भूगोल आणि हवामानशास्त्राच्या
पलिकडे त्याला वैश्विक सांस्कृतीचे विलक्षण वेधक परिमाण आहे. आपल्या सामाजिक नव्हे,
तर कृषी आर्थशास्त्राबरोबर रजकीय संदर्भही त्याला आहेत. हजारो वर्षे विविध ओळखी
असलेल्या जनसमूहांचे संमीलन, संघर्ष आणि स्पर्धेतून साकारलेलंसहजीवन हा या मान्सूनचा
परिणाम आहे. दक्षिण आशिया म्हणजे पाकिस्तान, भारत, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका
हे सर्व देश मिळून एक राष्ट्र बनतं असं मान्सून सांगतो.