Vidya Books Publishers
| SKU000086506

Bhartiya Murtishastra By Pradeep Mhaisekar - भारतीय मूर्तीशास्त्र

2 Kilograms
Be the First to Review
890950 ( 6.32% OFF)
Delivery
Enter pincode for exact delivery dates and charge
Safe and Secure payments.100% Authentic products
Specifications
BrandVidya Books Publishers AuthorPradip MhaisekarISBN9788194627609LanguageMarathiFormatHardbackYears2020Pages638
Description

शतपथब्राह्मण ग्रन्थात जे खरोखर प्रतिरूप आहे त्यास शिल्प म्हटले आहे.("यत् वै प्रति रूपम तच्छिल्पम") प्रतिरूप , प्रतीकात्मक धारणा आणि सगुणोपासना या बाबी प्रतिमा निर्मितीच्या उदयास कारणीभूत ठरल्या असून भारतीय मूर्तिशास्त्राच्या उदयाची पार्श्वभूमी अत्यंत प्राचीन आहे. आपल्या पूर्वजांनी मूर्तिशास्त्र विकसित केले असले तरी तत्कालीन मूर्ति निर्मिती प्रक्रिया त्याचे शास्त्र यावर आधुनिक काळात अजून ही अभ्यास होणे आवश्यक आहे , मराठी भाषेत या संदर्भात अगदी मोजकेच ग्रंथ उपलब्ध आहेत.
विष्णुधर्मोत्तर पुराणांच्या तिसऱ्या खंडात मूर्तिकलेच्या शास्त्रीय आधारावर चर्चा केली आहे म्हणजे ज्या मूर्ति निर्मिती प्रक्रियेस आपण बहुतांश वेळा केवळ कला या नजरेने पहातो ते मूलतः शास्त्र ही आहे आणि हे मूर्तिशास्त्र विकसित कसे झाले, त्याचे वेगवेगळे आयाम काय आहेत हे सांगणारा ग्रन्थ म्हणजे "श्री प्रदीप म्हैसेकर लिखित भारतीय मूर्तिशास्त्र" होय. या ग्रन्थाच्या आधारे मूर्ति निर्मितीची शास्त्रसंमत परंपरा अभ्यासता येईल.
मूर्तिनिर्मितीसाठीचे घटक कोणते असायला हवेत, प्रमाणबद्धता, तालमान यासोबत हिंदू धर्मातील ज्या महत्वाच्या देवता आहेत त्यांचे वर्णन ,त्यांच्या आयुधाचे वर्णन ही या ग्रन्थात आहे. अगदी पहिल्यांदाच मराठी मधील मूर्तिशास्त्र विषयक ग्रंथात आयुधाचे प्रतीकात्मक अर्थ मांडल्याचे दिसतात . प्रत्येक देवतेच्या हातातील आयुधाच्या मागे काहीतरी प्रतिकात्मक अर्थ असतो. हा अर्थ या ग्रन्थात आपल्याला पहावयास मिळेल. देवतांच्यामागे परिकर का असते ? अथवा त्या परिकरांचे स्वरूप कोणते? हे ही प्रथमतःच या ग्रन्थात अभ्यासता येईल.
भविष्य पुराणामधे देवालयाची निर्माण करणे हे कर्तव्य सांगितले आहे मात्र देवलायाचा आत्मा म्हणजे मूर्ति होय, ही मूर्ति शास्त्रशुद्ध असणे ही अनिवार्य सांगितले आहे मूर्ति दोषपूर्ण असेल तर यजमानास दोष लागतो, हानी होते अर्थात मूर्ति ही निर्दोषच असावी, प्रमाणबद्धच असावी असा काटेकोर नियम शिल्पीला पाळावा लागत असे, शिवाय मूर्तिच्या आयुवृद्धीसाठी प्राचीन शिल्पशास्त्रीय ग्रंथात वज्रलेपविधी कथन केला आहे , हा विधी ही प्रथमतःच मराठीमधे आपणास भारतीय मूर्तिशास्त्र ग्रन्थात वाचण्यास मिळेल.
प्राचीन भारतीय परंपरेत मूर्ति केवळ सगुणोपासनेसाठी नव्हत्या तर प्रतिरूप म्हणून ही मूर्ति निर्माण होत असत. पूर्व मध्ययुगीन काळात मूर्ति परंपरा आणि मंदिर परंपरा यांचा संयोग झाल्यानंतर मंदिर अलंकरणासाठी मूर्ति चा वापर होवू लागला आणि अगदी शासक असलेल्या राजाच्या मूर्तिचे अंकन ही मंदिराच्या बाह्यांगावर केल गेल्याचे दिसते, याचे उदाहरण म्हणजे अंबरनाथ मंदिर होय .
या शिवाय मंदिर अलंकरणसाठी देवांगना, व्याल यांचा ही वापर होत होता. प्रस्तुत ग्रंथात यांचा ही उहापोह केल्याचे दिसून येते.
"भारतीय मूर्तिशास्त्र" हा ग्रन्थ सर्वार्थाने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मंदिरातील आत्मरूप मूर्ति हा या ग्रन्थाचा प्राण असल्याकारणाने मूर्तिशी संबन्धित सर्व शास्त्र या ग्रन्थात कथन केले आहे. वाचक अभ्यासक, संशोधक यांच्या साठी हा ग्रंथ नक्कीच मैलाचा दगड ठरेल या नवीन पुस्तकाचे वाचकांच्या, संशोधकांच्या वैचारिक विश्वात मन:पूर्वक स्वागत...!